जुन्या वादातून महिलेसह तिघांना मारहाण; आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेसह तिचा भाऊ आणि आई यांना मारहाण करून विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर ही घटना घडली. गौरव बापू कोळी याने डोळे मारून तिचा हात ओढला, तर रोहित रामकृष्ण बेहेरे याने तिची ओढणी ओढून छातीला हात लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच शेखर सुभाष पारधी आणि अविनाश सुभाष पारधी यांनी तिला जबरदस्तीने अंगावर ओढल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याचवेळी गौरव बापू कोळी याने फिर्यादीच्या भावाच्या पाठीवर लोखंडी रॉडने वार करून दुखापत केली. तसेच समाधान रामचंद्र सपकाळे, आबा बापू कोळी, भैय्या हिलाल खैरनार आणि नितीन सुदाम कोळी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून संगनमताने फिर्यादी महिला व तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गौरव बापू कोळी, रोहित रामकृष्ण बेहेरे, शेखर सुभाष पारधी, अविनाश सुभाष पारधी, समाधान रामचंद्र सपकाळे, आबा बापू कोळी, भैय्या हिलाल खैरनार आणि नितीन सुदाम कोळी या आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भादंवि) कलम ७९, ११८(१), १९१(२), १९१(३), १८९(२), १८९(४), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गणेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *