सानेगुरुजी स्मारक परिसरात प्रेमी युगुलांवर दामिनी पथकाची कारवाई; मुलींना दिले पालकांच्या ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गलवाडे रस्त्यावर सानेगुरुजी स्मारक परिसरात दोन प्रेमी युगुलांवर दामिनी पथकाने कारवाई केली. तसेच मुलींना समज देऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भर दुपारच्या उन्हातील रस्त्यावरील शांततेचा गैरफायदा घेत प्रेमी युगुल शहराबाहेरील मंदिरे ,स्मारक ,टेकडी आदी ठिकाणी प्रेम चाळे करण्यासाठी जातात याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यासाठी विशेष दामिनी पथक नेमण्यात आले आहे. १० रोजी दुपारी  एका जागृत नागरिकाने पोलिसांना फोन केला की गलवाडे रस्त्याकडे असणाऱ्या  सानेगुरुजी स्मारकच्या जागेकडे प्रेमीयुगुल गेले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे, पोलीस कॉन्स्टेबल श्यामल पारधी, मोनिका पाटील, सुनील पाटील यांना पाठवले. दामिनी पथकाने दोन्ही प्रेमी युगुलना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. दोन्ही मुली  अमळनेर शहरातील असून वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. पोलिसांनी दोन्ही मुलींच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, हर्षल किशोर पाटील रा आर्डी व राज प्रवीण  संदानशिव या दोघांवर पोलिसांनी ११२ ,११७ प्रमाणे कारवाई केली आहे.

 

पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे

 

अनेक मुले, मुली शिकवणी, क्लासच्या नावाने पालकांशी खोटे बोलून घरातून निघून आपल्या प्रियजनांना भेटायला निर्जनस्थळी जातात. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे. नागरिकांनी तातडीने दामिनी पथकाला माहिती द्यावी. गैरकृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *