
प्रा. हितेश पवार यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्धी
अमळनेर (प्रतिनिधी) पिळोदे येथील प्रा. हितेश पवार यांनी खराब इंजिन ऑईलपासून पर्यायी इंधननिर्मितीच्या विषयावर केलेल्या संशोधनाला ‘एल्सेव्हियर’ प्रकाशनाच्या ‘फ्युएल’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्धी मिळाल्याचे वृत्त आहे. टाकाऊ इंजिन ऑईलचा उपयुक्त वापर आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने या संशोधनाला महत्त्व आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पिळोदे गावाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
खराब इंजिन ऑईलची योग्य विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. ही समस्या लक्षात घेऊन प्रा. हितेश पवार आणि त्यांच्या संशोधन सहकाऱ्यांनी त्यापासून पर्यायी इंधननिर्मितीच्या शक्यतांवर संशोधन केले. इंधनाची वाढती गरज आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रा. हितेश पवार हे पिळोदे येथील माजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अनिल पवार यांचे लहान बंधू आहेत. अनिल पवार यांनी सहकार क्षेत्रात, तर प्रा. हितेश पवार यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात योगदान दिले आहे. या संशोधनाबद्दल प्रा. हितेश पवार यांचे अविनाश पवार व मित्रपरिवार, पिळोदे यांच्यासह त्यांचे हितचिंतक अभिनंदन करत आहेत. त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply