गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटनेतर्फे स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नव्याने गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या कविता सुर्वे यांचा अमळनेर शहर खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच शैक्षणिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पदभार स्वीकारल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती, शिक्षकांचे विविध प्रश्न तसेच शैक्षणिक दर्जात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास संघटनेचे तालुकाध्यक्ष आशिष पवार, महेंद्र रामोशे, स्वप्नील पाटील, साने गुरुजी पतसंस्थेचे संचालक संजीव पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, कैलास पाटील, अमोल पाटील, राकेश पाटील, सुनंदा पवार, भारती आठवले, भुपेंद्र वानखेडे, अविनाश पाटील, जयेश शिरसाठ आणि सुरेश पवार यांच्यासह तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख किरण शिसोदे यांनी केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *