लायन्स क्लबच्या मोफत हाडे-सांधे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेरसह परिसरातील १०५ रुग्णांनी घेतला लाभ; तज्ज्ञांकडून आधुनिक उपचारांबाबत मार्गदर्शन

 

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने रविवारी दि. २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत हाडे व सांधे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

न्यू प्लॉट परिसरातील प्राजक्ता क्लिनिक येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले. शिबिरात हाडे व सांधे विकारांवरील तज्ज्ञ डॉ. संदीप सुरेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई येथील व्ही. एन. देसाई व एमसीजीएम रुग्णालयात विभागप्रमुख म्हणूनही काम पाहिलेले आहे. यावेळी सांधे प्रत्यारोपण, गुडघे व खांदा प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच कंबरदुखी यांसारख्या आजारांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक व रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन करत रुग्णांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा अमळनेर तालुक्यासह पारोळा, चोपडा, नरडाणा व शिंदखेडा परिसरातील तब्बल १०५ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ. संदीप जोशी, सचिव ला. महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष ला. नितीन बिंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन ला. शेखर धनगर, ला. डॉ. धीरज कोकाटे, ला. राजेश कुंदनानी, डॉ. मिलिंद नवसारीकर, रवींद्र कॉलरा, प्रशांत सिंघवी, रवींद्र जैन, निरज अग्रवाल, प्रदीप जैन, प्रदीप अग्रवाल, सुनील चौधरी, एस. डी. भरुचा, डॉ. किशोर शहा, योगेश मुंदडा, डॉ. रवींद्र कुलकर्णी, शाम गोकलानी, राजेश वरलानी तसेच प्रा. नयना नवसारीकर आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *