मनोज पाटील कुटुंबीयांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून सांत्वन

अमळनेर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोज भाऊराव (मनोजबापू) पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय सुधा भाऊराव पाटील यांचे २७ जून २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विधानपरिषदेचे माजी उपसभापती स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, सहकार क्षेत्रातील कार्य आणि राजकीय कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार चळवळीला मिळालेली दिशा आणि समाजहितासाठी केलेले कार्य याचे गौरवपूर्ण स्मरण करण्यात आले. यावेळी सांगण्यात आले की, १९८६ साली महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष म्हणून स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधित्व करत जपान, रशिया आणि जर्मनीचा दौरा केला होता. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली होती. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पिताश्री सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध तसेच सहकार आणि सार्वजनिक जीवनातील अनेक आठवणी उपस्थितांशी शेअर केल्या. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार सुधीर तांबे, मनोज भाऊराव (मनोजबापू) पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी लोटन पाटील, नगरसेवक राजू दादा फाफोरेकर, जितेंद्र ठाकूर, हेमंत पवार, शत्रुघ्न पाटील, महेश पाटील, विश्वनाथ ठाकरे, भागवत सूर्यवंशी, जुबेर पठाण, तुषार संदनशिव, पी. वाय. पाटील, रऊफ पठाण, शिवाजी पाटील, गौरी शिंगणे, सुधीर वाघ, प्रताप पाटील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी मनोज भाऊराव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत दुःखाच्या प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली. तसेच स्वर्गीय सुधा भाऊराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *