अमळनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीतील २४ वाहनांचा १८ रोजी होणार लिलाव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या २४ वाहनांचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून, तसे आदेश तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी काढले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील तापी, पांझरा व बोरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे विविध उपाययोजना व मोहिमा राबविण्यात येत आहेत.

मागील काही वर्षांच्या कालावधीत महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ११ ॲपेरिक्षा व १३ ट्रॅक्टर अशी एकूण २४ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने सध्या तहसील कार्यालय, शासकीय धान्य गोदाम तसेच संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात लावून ठेवण्यात आली आहेत. सदर वाहन मालकांना दंडात्मक नोटीस व आदेश देऊनही त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नसल्याने, महसूल अधिनियमानुसार या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावातून मिळणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे.

या वाहनांचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी काढले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *