अमळनेर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना; RPF जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात आज मध्य रात्री १२ ते १ च्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जयपाल सिंह नामक जवानाने स्वतःवर डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना RPF कार्यालयात घडल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जवानाने डोक्यात गोळी झाडून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर तात्काळ जखमी जवानाला वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या दरम्यान डॉ. अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळत आहे.

घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *