
त्रिवेणी महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार व विविध स्पर्धां
अमळनेर (प्रतिनिधी) येथील त्रिवेणी महिला मंडळातर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. शि. मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी प्रमोद पाटील होत्या. महिला दिनानिमित्त मंडळातील घरासाठी हातभार लावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले तसेच बेस्ट वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मंडळाच्या संचालिका विद्या शहा, अध्यक्षा मिनाक्षी देशमुख, माजी उपाध्यक्षा नेहा देशपांडे, हेमा पुरकर, निशा दुसाने, अर्चना शहा, गायत्री सराफ, उज्वला अमृतकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सपना पाटील, सरला शिंपी, मनिषा शेंठे, उज्वला मालपुरे, अल्का गिरी, मंजुषा शिरोडे, लता दुसाने, शितल ठाकूर, पूजा वाणी, चित्रा शिरोडे, वासंती ताई, संगीता गुजराथी, माया सोनार, कल्पना पाटील, विद्या पाटील आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांना नाश्ता व आईस्क्रीम देण्यात आले.
स्पर्धांमध्ये गेममध्ये प्रथम क्रमांक शितल ठाकूर यांनी, द्वितीय क्रमांक अल्का गिरी यांनी पटकावला. बेस्ट ड्रेस स्पर्धेत मनिषा नेरकर, शितल ठाकूर, संगीता गुजराती, रेखा बागुल, नीता ढेरे, कल्पना पाटील, सीमा सेटीया, सुनिता सेटीया या विजेत्या ठरल्या. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संचालिका सुरेखा सराफ यांनी विशेष सहकार्य केले. आभार माधुरी पाटील यांनी मानले.

Leave a Reply