
धनदाई महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन
पुरुष गटात धरणगाव महाविद्यालय, तर महिला गटात प्रताप महाविद्यालय अमळनेर विजयी

अमळनेर (प्रतिनिधी ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समितीच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेचे धनदाई महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. नयनाताई पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एरंडोल विभागाचे सचिव प्रा. डॉ. देवदत्त पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांतील संघ व्यवस्थापक व क्रीडा संचालक उपस्थित होते. यामध्ये प्रा. डॉ. हर्ष सरदार, प्रा. डॉ. क्रांती क्षीरसागर, प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. दीपक पाटील, प्रा. मुकुंद शिरसाट यांच्यासह धनदाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. राहुल इंगळे, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. डॉ. महादेव तोंडे, कैलास आहिरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शैलेश पाटील यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून प्रा. डॉ. देवदत्त पाटील, क्रीडा शिक्षक क्षितीज सोनवणे, निखिल पाटील, भगत, आदित्य राज, दक्ष पाटील, साहिल तसेच इतर हॉलीबॉलप्रेमींनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेसाठी मैदानाची व्यवस्था, नियोजन आणि इतर सर्व आयोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंसह उपस्थित प्रेक्षकांनी धनदाई महाविद्यालयातील मैदान व व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये उत्साह, क्रीडाभावना आणि चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले.
एरंडोल विभाग क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. अशा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच संघभावना, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल
पुरुष गट :
🥇 प्रथम – धरणगाव महाविद्यालय
🥈 द्वितीय – बांभोरी ए.एस.सी. कॉलेज
🥉 तृतीय – एस.एस.बी.टी. इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी
एकूण सहभागी संघ – ९
महिला गट :
🥇 प्रथम – प्रताप महाविद्यालय, अमळनेर
🥈 द्वितीय – डी.डी.एस.जी.पी. कॉलेज, चोपडा
🥉 तृतीय – धरणगाव महाविद्यालय
एकूण सहभागी संघ – ६

Leave a Reply