विट भट्टी परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पाठविण्याचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धरणगाव रोडवरील दिपक शांताराम कुभार व गिरीष शांताराम कुभार यांच्या विट भट्टीमध्ये दिनांक २ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती काटेरी झाडाखाली सावलीत पडलेल्या अवस्थेत आढळून आली.

या व्यक्तीला तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनिल श्रावण पाटील (वय ६०, व्यवसाय शेती, रा. चोपडा नाका, पैलाड, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे, उंची ५ फूट २ इंच, रंग काळा, शरीरयष्टी सडपातळ, केस काळे, चेहरा अंडाकृती, नाक सरळ व डोळे काळे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई उदय राजेंद्र बोरसे करीत आहेत. संबंधित अनोळखी मृत व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्याशी (०२५८७-२२३३३३) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *