मनसेच्या अमळनेर तालुका सचिवपदी पवन आबा शिंदे यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमळनेर तालुका सचिवपदी पवन आबा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली.

जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संदीप पाचंगे व आशिष साबळे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष मुकुंदा (भाऊ) रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमळनेर तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) यांच्या हस्ते पवन शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी पक्षाच्या ध्येय-धोरणांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार करणे, संघटन मजबूत करणे तसेच तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य प्रभावीपणे वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. नियुक्तीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पवन शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *