
शाळांमध्ये थोर महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा जन्म दिवस “राष्ट्रीय विज्ञान” दिवस म्हणून साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळांमध्ये थोर महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा जन्म दिवस “राष्ट्रीय विज्ञान” दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यात आला.
साने गुरुजी कन्या हायस्कूल
अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. व्यासपिठावर ज्येष्ठ शिक्षक दिलीप पाटील हे अध्यक्षस्थानी होते. वैद्य, मुकेश पाटील, विज्ञान शिक्षक डी. आर. महाजन उपस्थित होते. दिप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने, म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट व ग्लिसरीनच्या मिश्रणाने करण्यात आला. सी.व्हि .रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात दिपक महाजन यांनी सी.व्ही.रामण यांच्या कार्याचा व संशोधनाचा परिचय करुन देत आपण विज्ञानाची कास धरा हे सांगितले. ऋतुजा बावा, पुजा पाटील, अपुर्वा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुकेश पाटील व वैद्य मॅडम यांनी आपल्या भाषणात विज्ञान व त्या निमित्त मानव जातीची झालेली प्रगती ह्या विषयी आपले मनोगत व्यक्त करून वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला. अध्यक्षिय भाषणात दिलीप पाटील यांनी प्रत्येक विषयात विज्ञानाची कशी सांगड आहे हे उदाहरणा द्वारे विद्यार्थिनिंना समजून सांगितले. श्रावणी पाटील या विद्यार्थिनीने पेटता कापूर हातावर धरून तोंडात टाकून प्रयोग करून दाखवला. आपण अंधश्रद्धे पासून दूर राहावे,असे सांगितले. सूत्रसंचलन साक्षी मनोहर पाटील व लावण्या शिसोदे यांनी तर आभार लावण्या शिसोदे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
जी. एस. हायस्कूल
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अंधश्रद्धेला बळ देणाऱ्या विविध घटनांशी निगडीत प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करत त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांसमोर मांडला. समाजातील श्रद्धेमागील वाढत चाललेली अंधश्रद्धा कशी कमी करता येईल यावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. मुख्याधापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी.एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी आर.जे.पाटील, जेष्ठ लिपीक जयश्री भालेराव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विज्ञान शिक्षक एस. ए.खांजोडकर, एच.बी. महाजन, जी. डी. ताठे देशमुख, एल.सी. बंजारा,ए.ए.पाटील, एस.आर. पाटील, आर.डी.पाटील, एच.एस.चौधरी, आर.एन.साळुंखे, ए.एन.पाटील, एस.ए. शेवगेकर, डी. व्ही. राऊळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
पी.बी. ए इंग्लिश मीडियम स्कूल
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांचा जन्मदिवस या विज्ञानवादी उत्क्रांतीवादी विचारसरणी अवलंबलेले महान व्यक्तित्व या महान दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचा एक गट विभाग तयार करण्यात आला होता व इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचा दुसरा विभाग गट हा तयार करण्यात आला होता. विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीचा अविष्कार साधून मानव जातीला उपयुक्त त्यांचे जीवन व कार्य सुकर करणारे तसेच भारत देशाला महासत्ता बनविणारे नानाविविध उपकरण प्रयोग प्रणाली त्यांनी तयार केल्या होत्या. त्यांचे विवेचन व मांडणी सविस्तर व विस्तृत विवेचन त्यांनी परीक्षकांसमोर व्यक्त करून त्यांना सुद्धा अचंबित व प्रभावित केले. या परिक्षकांमध्ये महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन कार्य केलेले जेष्ठ परीक्षक हे ज्युरी मंडळाचे सदस्य होते. यामध्ये डी. के. पाटील, पी.बी. भराटे, पी. आर. भावसार, निरंजन पेंढारे उपस्थित होते. त्यांनी विविध प्रयोगाचे परीक्षण केले. या परीक्षकांनी आपल्या मनोगत भावना व्यक्त करताना म्हणाले की आजची पिढी ही प्रतिभावान व अचाट व अफाट वैज्ञानिक ज्ञानवंत दृष्टिकोन बाळगणारी असुन त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रयोगातून जाणवत आहे. ते छोटे वैज्ञानिक येणाऱ्या काळात भारताचे खरे आधारस्तंभ ठरतील. कार्यक्रमासाठी चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, व्ही.एस. अमृतकर, व्ही.जी. बोरोले, डिंपल देसाई, स्वाती माळी, योगिशा महाजन , वाय. पी. ओवे, सविता पवार, श्रावण पाटील, प्रशांत वंजारी, अनंत बागल, समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply