जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा; अमळनेरचे भाजीपाला मार्केट आज बंद

अमळनेर (प्रतिनिधी) जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमळनेरचे भाजीपाला मार्केट शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील नगरपालिकेचा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलन व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अमळनेर येथील भाजीपाला मार्केट उद्या बंद ठेवण्याचा निर्णय भाजीपाला असोसिएशनने घेतला आहे.

त्यामुळे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी भाजीपाला लिलाव मार्केटही बंद राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन किरकोळ भाजीपाला विक्रेता असोसिएशन व भाजीपाला अडत असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *