तापी नदी माता जन्मोत्सवानिमित्त जयश्रीताई पाटील यांनी अर्पण केली साडी-चोळी

अमळनेर (प्रतिनिधी)  तापी नदी माता जन्मोत्सवानिमित्त पाडळसरे धरण येथे माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई अनिल पाटील यांनी तापीमाईला साडी-चोळी अर्पण करून विधीवत पूजन केले. श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

यावेळी जयश्रीताई अनिल पाटील यांनी तापीमाईच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत अमळनेर मतदारसंघ सदैव सुजलाम, सुफलाम, समृद्ध आणि जलसंपन्न राहावा, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद, भरभराट आणि सुख-समृद्धी नांदावी तसेच अमळनेर शहराची पिण्याच्या पाण्याची गरज अखंडितपणे भागत राहावी, अशी मनोभावे प्रार्थना केली.

तसेच तापीमातेचे अखंड आशीर्वाद सर्वांवर राहोत आणि जलसमृद्धीच्या बळावर विकासाचा प्रवाह अविरत सुरू राहावा, अशी मंगलकामनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण व शहरातील पदाधिकारी, अमळनेर नगरपरिषदेचे नगरसेवक व नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सरपंच तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तापीमाईला फुले अर्पण करून विधीवत पूजन करत तापी नदी माता जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *