
कस्तुराबाग येथून मोटारसायकल चोरी; घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुंदडा नगर-१ जवळील कस्तुराबाग नगर परिसरातून होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना दि. २२ रोजी रात्री सुमारे अडीच वाजता घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रा. नितीन शांताराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील शांताराम माणका महाजन यांची होंडा शाईन कंपनीची (एमएच १९, एवाय ६१६७) मोटारसायकल घराच्या अंगणात लॉक करून तसेच पुढील चाकाला साखळी-दांड्याने बांधून ठेवली होती. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मोटारसायकलचे लॉक तोडता न आल्याने थेट मोटारसायकल उचलून नेली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोर मोटारसायकल उचलून नेताना दिसत आहेत, तर तिसरा चोर काही अंतरावर पुढे उभा राहून लक्ष ठेवत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी साडेसहा वाजता मोटारसायकल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर प्रा. नितीन चव्हाण यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.

Leave a Reply