कळमसरेत आमदार अनिलदादा पाटील, उपमहापौर सुधाकर चौधरी यांचा नागरी सत्कार

माळी पंच मंडळाचा उपक्रम; २० लाखांच्या सभामंडपाचे भूमिपूजन, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे माळी पंच मंडळाच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, सुरत महानगरपालिकेचे उपमहापौर सुधाकर चौधरी आणि डॉ. राजेंद्र महाले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यानिमित्त कळमसरे बसस्थानकापासून दुर्गानगर न्यू प्लॉट, गावातील श्रीराम मंदिर चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले माळीवाडा चौक आणि दत्त मंदिर चौकातून फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी मिरवणूक काढण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. आमदार अनिलदादा पाटील यांनी माळी समाजासाठी सभामंडप उभारण्यासाठी यापूर्वी २० लाख रुपयांचा निधी दिला होता. या सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून, त्यालगत आणखी २० लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, डॉ. राजेंद्र महाले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, जयवंतराव पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, सुरत येथील मछिंद्र माळी, नामदेवराव बागुल, नारायण अनारसे, सुनील वाघ, डॉ. किरण पाटील, मनोज माळी, अश्विनभाई, हितेश सोनवणे, भटू माळी, सुनील माळी आणि संतोष माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, माळी पंच मंडळ तसेच गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने सुधाकर चौधरी आणि डॉ. राजेंद्र महाले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुरलीधर महाजन, अशोक चौधरी, मुरलीधर चौधरी, बाबूलाल पाटील, संजय चौधरी, नथु चौधरी, सुदाम चौधरी, रविंद्र महाजन, आबा महाजन, हेमंत चौधरी, गजानन पाटील, साहेबराव चौधरी, दिपक वैराळे, सुरेश महाजन, जी. टी. टाक, रमेश चौधरी, कडू चौधरी, जे. वाय. कुंभार, सुरेश चौधरी, चुनीलाल महाजन, नितीन चौधरी, गोपाल पाटील, भालचंद्र चौधरी, अरुण चौधरी, विकास पाटील, किशोर चौधरी, एकनाथ चौधरी, विजय चौधरी, विकास चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, विकास महाजन, विठ्ठल महाजन, नारायण पाटील, रत्नाकर गुरव, योगेंद्रसिंग पाटील, किरणसिंग राजपूत, जयदीप राजपूत, अंबालाल पाटील, रणजितसिंग पाटील, धर्मेंद्रसिंग पाटील, गोपीचंद चौधरी, डॉ. कपिल महाजन, डॉ. रामचंद्र महाजन, प्रदीप महाजन, प्रवीण चौधरी, दीपेशचंद छाजेड, भीमराव चौधरी, दिलीप चौधरी, विलास चौधरी, सुभाष चौधरी, मनोज चौधरी, धनराज चौधरी, रामदेव महाराज, अरुण महाजन तसेच पंच मंडळाच्या संचालक मंडळासह सर्व माळी समाजबांधवांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. हिरालाल पाटील यांनी मानले.

 

पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार

यावेळी प्रा. हिरालाल पाटील यांना जळगाव येथे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल, मधुकर यशवंत पाटील यांना कळमसरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव झाल्याबद्दल, तर पिंटू राजपूत यांना बोहरा साने गुरुजी उपसा सिंचन योजना जिल्हा बँकेसाठी बिनविरोध ठराव मिळाल्याबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला.

 

कर्मभूमीत गावाचे नाव लौकिक तर जन्मभूमीत सन्मान : आमदार अनिलदादा पाटील

 

“आपली ओळख आपल्या सेवेने होते. कर्मभूमीत प्रामाणिक सेवा बजावताना कर्मभूमीत गावाचे नाव लौकिक केले. म्हणून जन्मभूमीत सुधाकर चौधरी यांचा आज नागरी सत्कार होत आहे,” असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी केले. कळमसरे येथे सुधाकर चौधरी यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते. सुधाकर चौधरी यांची सुरत महानगरपालिकेत बहुमताने निवड झाल्यानंतर उपमहापौर म्हणून निवड झाली. त्यानिमित्त माळी पंच मंडळाने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते.

 

जन्मभूमीच्या सत्काराने भारावलो : उपमहापौर सुधाकर चौधरी

 

सत्कारादरम्यान सुधाकर चौधरी यांनी आपल्या कामाची सुरुवात वायरमन म्हणून केल्यापासून सलग तीन टर्म नगरसेवक आणि आता उपमहापौर पदापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. यावेळी माळी समाजबांधवांसह ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *