प्रताप महाविद्यालयाच्या अंकिता जैन नेट परीक्षेत उत्तीर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी अंकिता जैन हिने केली आहे. तिने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट ) यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशात मोलाची भर घातली आहे.

या यशाबद्दल तिचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी अंकिता जैन हिचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट होते, असे त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभास मराठी विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी अंकिता जैन हिचे अभिनंदन करत तिच्या मेहनतीचे व चिकाटीचे कौतुक केले. इतर विद्यार्थ्यांनीही तिच्या यशातून प्रेरणा घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. रमेश माने, डॉ. विलास गावीत, प्रा. योगेश पाटील, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे आणि प्रा. गोपाळ बडगुजर हे प्राध्यापक उपस्थित होते. अंकिता जैन हिच्या या यशामुळे प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या पुढील वाटचालीस सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *