
इतिहास विभागाचे घवघवीत यश; विद्यार्थ्यांची शिक्षक व विद्युत सहाय्यक पदावर निवड
अमळनेर (प्रतिनिधी )स्पर्धेच्या युगात मेहनत व जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना यश नक्कीच मिळते, याची प्रचिती खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील इतिहास विभागाने पुन्हा एकदा दिली आहे. विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.
इतिहास विभागातील माजी विद्यार्थिनी व तासिका तत्त्वावरील प्राध्यापिका कु. प्रियंका चावडा यांची ‘पवित्र पोर्टल’ मार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. तसेच एम.ए. (इतिहास) द्वितीय वर्षातील विद्यार्थी भूषण राठोड याची महावितरण विभागात विद्युत सहाय्यक पदावर निवड झाली आहे.
महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, इतिहास संशोधन तसेच NET/SET परीक्षांसाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते. तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे सांगण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव व खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष मा. निरज भाऊ अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र भाऊ जैन व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी उपप्राचार्य व IQAC समन्वयक प्रा. डॉ. मुकेश भोळे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी तसेच प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. विजय साळुंखे, प्रा. अवित पाटील आणि प्रा. प्रसाद मुठे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply