
अमळनेरच्या भरवस्तीतून चारचाकीतून दोन गायी लंपास; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती आणि भरवस्तीच्या भागातही जनावरांची चोरी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शहरातील मराठा मंगल कार्यालयाजवळून १८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० ते २.४० वाजेच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून दोन गायी चोरून नेल्याची घटना घडली. यश वर्मा यांच्या मालकीच्या या दोन्ही गायी चोरट्यांनी चारचाकी वाहनातून पळवून नेल्या असून, चोरीचा हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती भागात आणि भरवस्तीत पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून जनावरे चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाल्याने पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास करून संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply