अमळनेरात १४ ऑक्टोबरला सती माता महिला पायी दिंडी; पहाटे ४.३० वाजता होणार प्रारंभ

अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्रोत्सवानिमित्त चांदणी कुर्हे येथील ग्रामदैवत सती माता यांच्या दर्शनासाठी अमळनेरात बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी चौथ्या वर्षी भव्य महिला पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४.३० वाजता पाचपावली मंदिरापासून या दिंडीला प्रारंभ होणार असून, सती माता मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात येणार आहे.

सती माता महिला समिती, अमळनेर यांच्या वतीने आयोजित या दिंडीमध्ये महिला भाविक भक्तिभावाने सहभागी होणार आहेत. राधेय डीजेच्या तालावर दिंडी मार्गस्थ होणार आहे. खा. शि. मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरीताई पाटील आणि योगिता पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. दिंडीच्या आयोजनासाठी समितीच्या महिला पदाधिकारी शीतल सावंत, दिशा संदानशिव, मोहिनी सोनार, भारती कोळी, प्रियदर्शिनी रजाळे, निवेदिता कापडणेकर, रोहिणी शिरसाट, अश्विनी सावंत, प्रतिभा पाटील, अर्चना शाह, अनिता जाधव आणि सुनीता मोरे यांच्यासह अनिता चौधरी परिश्रम घेत आहेत.

दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व माता-भगिनींनी पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन सती माता महिला समितीने केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *