मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) : ग्रंथ हेच ज्ञानाचे भांडार असून ग्रंथपाल हा त्या ज्ञानसंपदेचा मार्गदर्शक असतो, या भावनेतून मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात भारताचे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती तथा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी ग्रंथालयशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले. प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले यांनी ग्रंथालयाचे शैक्षणिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करत ज्ञानाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्यासाठी ग्रंथपालांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञानस्रोत उपलब्ध करून देत वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी ग्रंथपालांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी प्रा. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन करताना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञान, वाचन आणि संशोधन संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारा राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *