अमळनेरमध्ये बजरंग दलाचा पाणी कुंडे उपक्रमने तहानलेल्या मुक्या जीवांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील भटक्या जनावरांपुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही गरज लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेर यांच्या वतीने शहरात सिमेंटच्या पाण्याच्या कुंड्यांची उभारणी करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच मोकळ्या जागांमध्ये पाण्याने भरलेली कुंडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या मुक्या पशु व गोवंशांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत कुंड्यांमध्ये नियमित पाणी भरण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यासोबतच शहरातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन कुंड्यांमध्ये पाणी भरून मुक्या जीवांची तहान भागवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश देण्यात आला असून, शहरात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी….. यांचे सहकार्य मिळत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *