
अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा शुभारंभ उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी )स्तंभारोपण आणि अन्नपूर्णा खांबाचे पूजन करून वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा पारंपरिक पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. यावेळी परंपरेनुसार हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच भक्तांना प्रसाद वाटून यात्रोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी प्रसाद महाराज यांनी वाडी संस्थान येथे विठ्ठल-रुख्मिणीची पूजा केली. त्यानंतर भालदार-चोपदारांसह वारकरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टाळ-नृत्याच्या आनंदात मिरवणूक नदी पात्रात पोहोचली. येथे अभय देव यांच्या हस्ते अन्नपूर्णा खांबाचे पूजन करून तो रोवण्यात आला. संपूर्ण यात्रोत्सवात अन्नाची कमतरता भासू नये, याचे प्रतीक म्हणून या खांबाला विशेष महत्त्व आहे.
यानंतर संत सखाराम महाराज समाधी मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यात आले. जय देव यांच्या हस्ते पूजन करून यात्रेचे स्तंभारोपण करण्यात आले. यावेळी पुजारी केशव पुराणिक, सारंग पाठक, जयंत कौंडिण्य, अभय जोशी, चारुदत्त जोशी व सुनील देव यांनी विधिवत पूजा केली.
या प्रसंगी हभप प्रसाद महाराज यांनी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जयश्री पाटील, सुभाष चौधरी, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, एपीआय रवींद्र पिंगळे, माजी न्या. गुलाबराव पाटील, निरंजन अग्रवाल, डॉ. अनिल शिंदे, अनिल महाजन, वसुंधरा लांडगे, जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर, सभापती साहेबराव पवार, नरेंद्र संदानशीव, महेश देशमुख, गुलाब काशिनाथ पाटील, हरी भिका वाणी, कैलास पाटील, रामकृष्ण पाटील, विक्रांत पाटील, सुरज परदेशी, राजू फापोरेकर, प्रताप शिंपी, महेश गर्गे, अमोल राणे, संजय पाटील, भरतसिंग परदेशी, विनोद कदम, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, ॲड. महेश बागुल, गुड्डू देशमुख, बाविस्कर सर, पी.एल. मेखा, महेश कोठावदे, डी.एम. पाटील, बाळू पाटील, प्रताप साळी, देवेंद्र कांबळे, रामकृष्ण पाटील, श्रीराम चौधरी, पंकज चौधरी, बहीरम सर, विजय बागुल, सतीश देशमुख, विजय चौधरी, गौरव पाटील, विजय काहरू पाटील, मोतीलाल अहिरे, चंद्रकांत साळी, सुभाष महाजन, देविदास देसले, प्रशांत सराफ, नाना धनगर, आरोग्य निरीक्षक किरण कांडारे, पांडुरंग भोई, सिद्धांत शिसोदे, ॲड. रविंद्र देशमुख, सुरेश अर्जुन पाटील, प्रभाकर देशमुख, जितेंद्र देशमुख, नितीन निळे, शितल देशमुख, उमेश वाल्हे, पंकज भोई, प्रा. पी.जे. देशमुख, संजय चौधरी, चंदू परदेशी, इम्रान खाटीक, राजाराम बडगुजर, तुळशीराम हटकर, डॉ. महेश पाटील, सुनील भोई, दीपक चौगुले, नेरकर, रामदास शेलकर, प्रवीण जैन यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांना प्रसाद देऊन यात्रोत्सवाचे निमंत्रण दिले.
यात्रोत्सवाच्या शुभारंभामुळे अमळनेर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पुढील कार्यक्रमांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply