शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात मिठाई वाटप; युवासेनेकडून आनंदोत्सव साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे युवासेनेतर्फे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेची जनसेवेची परंपरा आणि हिंदुत्वाची विचारधारा अधिक बळकट करण्याचा संकल्प युवा सैनिकांनी व्यक्त केला.

शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देणारी संघटना असून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामान्य रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास लाखो युवकांसाठी आदर्श असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख निखिल चौधरी, जिल्हाप्रमुख रोहित कोगटा तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात अमळनेर युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर, शहरप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील, उपतालुकाप्रमुख जयेश चव्हाण, उपशहरप्रमुख सनी चव्हाण, उपशहरप्रमुख तुषार सोनार, शहर संघटक पंकज अरुण चौधरी तसेच शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख यश विलास हापसे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास अमळनेर नगरपरिषद शिवसेना शहरप्रमुख भरत पवार, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, गटनेते व नगरसेवक पंकज चौधरी, अमळनेर नगरपरिषदेचे प्रतोद व नगरसेवक नाविद शेख तसेच नगरसेवक दीपक चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या गौरवशाली ६० वर्षांच्या वाटचालीचा गौरव करत संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जनसेवा, संघटन बांधणी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्याचा संकल्प करण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *