राष्ट्रवादी नेत्या रिता बाविस्कर यांच्या कारवर हल्ला, लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून गाडी पंक्चर; तिघांना अटक

अमळनेर (प्रतिनिधी)  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या तथा महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय राज्य नियोजन समितीच्या सदस्या यांच्या कारवर धुळे तालुक्यातील वणी गावाजवळ हल्ला झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. लोखंडी खिळे असलेला रॉड टाकून कारचे टायर पंक्चर करण्यात आले तसेच वाहनाची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगर येथील रहिवासी असलेल्या रिता बाविस्कर या आपल्या भावासह १२ मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुंबईकडे चारचाकी वाहनाने निघाल्या होत्या. मंगरूळ परिसरातून त्यांच्या वाहनाचा एका कार व मोटरसायकलवरील काही जणांनी पाठलाग सुरू केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वणी गावाजवळ ओव्हरटेक करून हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाच्या पुढील व मागील टायरमध्ये लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकत वाहन अडवले. घटनेनंतर हल्लेखोरांनी वाहनाची तोडफोड केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या रिता बाविस्कर यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली तसेच आपल्या मुलीलाही फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी हल्लेखोर आणि बाविस्कर यांच्यात वाद झाला असता, “गाडीत गाय असल्याचा संशय आल्याने वाहन अडवले,” असे संबंधितांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच यांनी पोलिस पथक रवाना करून संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मिलिंद पाटील (रा. वरखेडी), सौरभ जाधव (रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) आणि प्रमोद देविदास सोनवणे (रा. बाळापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११०, ३२४(४) व ३२४(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत. दरम्यान, या घटनेची दखल आमदार तसेच खासदार यांनी घेतली असून घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *