आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमळनेरात योग शिबिर; २१ जूनला योग महोत्सवाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिला पतंजली योग समिती, अमळनेर यांच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १९ जूनपासून सुरू झालेल्या या शिबिराचा रविवार, दि. २१ जून रोजी समारोप होणार आहे.

शिबिराचे दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमळनेर येथे २१ जून रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या तीन दिवसीय शिबिराचा समारोप रविवारी सकाळी भव्य योग महोत्सवाने होणार आहे. ‘पहिली आंघोळ घामाची, ती आपल्या कामाची’ या संदेशासह ‘करो योग, रहो निरोग’चा मंत्र देत महिला पतंजली योग समितीने नागरिकांना संपूर्ण परिवारासह सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. योगाचे फायदे सर्वांनाच माहीत असले तरी त्याची सुरुवात करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत आळस झटकून योगाचा प्रवास पुन्हा सुरू करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेत निरोगी जीवनशैली अंगीकारावी तसेच २१ जून रोजी होणाऱ्या योग महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला पतंजली योग समिती, अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *