आईवडिलांना भेटून परत येणाऱ्या मोटरसायकलस्वाराचा वाहनाच्या धडकेत उपचार सुरू असताना मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) गडखांबहुन आईवडिलांना भेटून अमळनेरकडे येणाऱ्या मोटरसायकलला वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना दिनांक ३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश बाळू ठाकरे (रा. गडखांब, हमु न्यू प्लॉट अमळनेर) हा २७ फेब्रुवारी रोजी आपली  मोटरसायकल (एमएच १९, ईडी ५७९०) हिच्यावर आपल्या आईवडिलांना भेटायला गडखांब येथे गेला होता. रात्री परत अमळनेर येताना त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो खाली पडून रक्तबंबाळ झाला होता. त्याला  उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. दिनांक ३ मार्च रोजी त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्याचे मेव्हणे निलेश शांताराम पाटील (रा. पातोंडा) यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *