संशयास्पद वेगाने पुढे वाहन नेणाऱ्या चालकविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) पैलाड नाक्यावर रात्रीच्या गस्तीवर नाकाबंदी करत असतानाही वाहन न थांबवता संशयास्पद वेगाने पुढे नेणाऱ्या वाहनविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३ मार्च रोजी पैलाड नाक्यावर पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , होमगार्ड विशाल चौधरी गस्त करत असत नियंत्रण कक्षकडून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. ४ रोजी पहाटे पोलीस उज्वलकुमार म्हस्के, अशोक कुमावत व होमगार्ड पाटील आणि मराठे हे देखील नाकाबंदी करायला आले. त्याचवेळी पिकअप व्हॅन (एमपी ०४ जी बी ३७७२)   आली. तपासण्यासाठी त्याला थांबण्याचा इशारा दिला ,शिट्टी वाजली तरी तो वेगात धरणगावकडे संशयास्पद निघून गेला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करून त्याला अडवण्यासाठी धरणगाव येथे कळवून नाकाबंदी लावली. त्याला तेथेही अडवण्याचा प्रयत्न केला असता तो तेथूनही न थांबता जळगावकडे पळून गेला. पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *