ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बन्सीलाल भागवतांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील सामाजिक कार्यकर्ते बन्सीलाल भागवत यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भागवत यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र चांदवड राजवाडा येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. ही नियुक्ती अमरजित राजे बारगळ (जाहागिरदार, तळोदा संस्थान व राष्ट्रीय संरक्षक) तसेच प्रविण काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवार, युवा आघाडी अध्यक्ष दीपक राहीज, आदित्य वाघमोडे यांच्यासह सरपंच निंबा तात्या कंखरे, नंदलाल धनगर, देविदास हटकर, सचिन सांगोरे, पाकळे दादा आदी मान्यवर उपस्थित होते. बन्सीलाल भागवत यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात धनगर समाजाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी समाधान धनगर, नितीन निळे, एस.सी. तेले, रमेश शिरसाठ, गोपिचंद शिरसाठ, रविंद्र लाळगे, जयप्रकाश लांडगे, हरचंद लांडगे, प्रभाकर लांडगे, प्रदीप कंखरे, गजानन धनगर, दिनेश भलकार, जिभाऊ कंखरे, भाऊलाल पाटील, विकास सूर्यवंशी, दिलीप ठाकरे, तुषार इधे, आनंदा हळप, आनंदा धनगर, रविंद्र भालेराव, डी.एस. धनगर, जगदीश भागवत, आर.सी. भालेराव, अशोक कंखरे, अर्जुन भागवत, लक्ष्मण निळे, बाळू देवकाते, प्रदीप रावण कंखरे, आर.पी. धनगर आदींनी स्वागत केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *