
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आज बूथ मेळावा; संघटन मजबुतीवर भर
अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाहीची खरी ताकद बूथ स्तरावर उभी राहते आणि संघटनेचे बळ कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून निर्माण होते, या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने अमळनेर मतदारसंघाचा भव्य बूथ मेळावा २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सायंकाळी ५ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे पार पडणार असून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात आगामी राजकीय घडामोडी, संघटन मजबुती, तसेच बूथ स्तरावरील नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिशा देणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि संघटनात्मक बळ वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. ‘प्रत्येक बूथ अधिक सक्षम करण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे,’ असे नमूद करत सर्व बीएलए (बूथ लेव्हल एजंट), कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपली उपस्थिती ही केवळ सहभाग नसून संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरेल, असे सांगत “एकजुटीने कार्य करून अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम व प्रभावी बनवूया,” असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply