प्रताप महाविद्यालयात ग्रंथालय दिन उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) : ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा दिवस देशभरात ‘ग्रंथालय दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे ग्रंथालय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. रंगनाथन यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. पराग पी. पाटील, सहसचिव डॉ. व्ही. बी. मांटे, उपप्राचार्य डॉ. अशोक जी. पाटील, रुसा समन्वयक डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ. डी. आर. चौधरी, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. टी. व्ही. रजाळे, माजी ग्रंथालय प्रमुख डॉ. एस. वाय. सोनवणे, डॉ. विजय तुटे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर यांच्यासह महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ग्रंथालयाचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी, संशोधनासाठी आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी ग्रंथालय हे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे सांगण्यात आले. बदलत्या डिजिटल युगात पारंपरिक ग्रंथालयांसोबतच ई-लायब्ररी आणि डिजिटल साधनांचे महत्त्वही वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात आला. ग्रंथपाल प्रा. डी. आर. पाटील यांनी ग्रंथालय विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *