युवा नाथ संघटना महाराष्ट्र राज्याच्या जळगाव खान्देश विभागीय अध्यक्षपदी विनोद राऊळ यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) युवा नाथ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्री. विनोद तुकाराम राऊळ यांची जळगाव खान्देश विभागीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कैलास इंगळे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.

संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच समाजहिताच्या कार्यात विनोद राऊळ यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नवनियुक्त विभागीय अध्यक्ष म्हणून विनोद राऊळ हे जळगाव खान्देश विभागात संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन, युवकांना संघटित करणे तसेच नाथ समाजाच्या विकासासाठी सक्रियपणे कार्य करतील, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

या नियुक्तीबद्दल विनोद तुकाराम राऊळ यांच्यावर सर्व स्तरातून व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *