३३ वर्षांनी शाळकरी मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट; अंबर्शी टेकडीवर आठवणींचा रंगला मेळा

अमळनेर (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय नगाव-गडखाम्ब येथील सन १९९३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन रविवारी ६ सप्टेंबर रोजी अमळनेर येथील निसर्गरम्य अंबर्शी टेकडी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल ३३ वर्षांनंतर शाळकरी मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने परिसरात जणू जुन्या आठवणींचा मेळाच भरला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा उत्साह दिसून आला.

गावात वास्तव्यास असलेले, विवाहानंतर सासरी गेलेल्या विद्यार्थिनी तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त विविध शहरांमध्ये स्थायिक झालेले माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनासाठी आवर्जून उपस्थित होते. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा संपर्कात आलेल्या या मित्र-मैत्रिणींनी आयुष्याच्या पन्नाशीत पदार्पण करताना बालपणातील

सोनेरी दिवस पुन्हा अनुभवले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सर्वांनी आपापले जीवनानुभव कथन केले. शालेय जीवनातील जुन्या गमती-जमती, आठवणी आणि किस्से सांगत मित्र-मैत्रिणींनी मनमुराद हास्याचा आनंद लुटला. विविध मनोरंजक खेळांमध्ये सहभागी होत सर्वजण काही काळासाठी पुन्हा शाळकरी वयात रमून गेले. स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन भास्कर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी ओघवत्या शैलीत केले. तब्बल तीन दशकांनंतर झालेल्या या भेटीने जुन्या मैत्रीला नव्याने उजाळा मिळाला. भविष्यातही परस्परांशी संपर्क आणि स्नेह कायम ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला.

 

३३ वर्षांनंतरची भेट ठरली अविस्मरणीय

 

१९९३ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हे स्नेहसंमेलन केवळ गेट-टुगेदर न राहता जुन्या आठवणी, मैत्री आणि आपुलकीचा भावनिक सोहळा ठरले. तीन दशकांनंतर पुन्हा भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत हा दिवस अविस्मरणीय केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *