प्रताप महाविद्यालयात क्रीडा कौशल्याचा जल्लोष; सात तालुक्यांतील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) : क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत एरंडोल विभाग क्रीडा समितीच्या वतीने प्रताप वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन जुदो, योग, रायफल व पिस्टोल शूटिंग तसेच स्क्वॉश स्पर्धा रविवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर स्टेडियम, प्रताप महाविद्यालय येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जवळपास सात तालुक्यांतील विविध महाविद्यालयांचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. पराग पाटील, सहसचिव डॉ. विजय मांटे, विद्यापीठ अधिसभा सदस्य तथा जिमखाना समन्वयक डॉ. संदीप नेरकर, एरंडोल विभाग क्रीडा सचिव डॉ. देवदत्त पाटील, डॉ. किशोर वाघ, डॉ. शैलेश पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. हर्ष सरदार, प्रा. खुशाल देशमुख, डॉ. सुनील राजपूत यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंनी जुदो, योग, रायफल व पिस्टोल शूटिंग आणि स्क्वॉश या विविध क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच खेळाडूंना विद्यापीठस्तरीय स्पर्धांसाठी आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. सर्व स्पर्धांचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील व प्रा. अर्चना पाटील यांनी केले. प्रा. सचिन वाघ यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रशांत देवकते यांच्यासह खेळाडूंनी स्पर्धांचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *