
कोपरा वाचनालयाच्या स्थापनेने सावित्रीबाई फुले विद्यालयात वाचन संस्कृतीला नवी दिशा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कोपरा वाचनालय (कॉर्नर लायब्ररी) सुरू करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एम. कोळी होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीमा सुरक्षा बलाचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर आत्माराम बाविस्कर, प्राचार्य डॉ. एस. जे. शेख (रुक्मिणीताई महाविद्यालय, अमळनेर), प्रा. डॉ. कैलास चव्हाण (आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय, शहादा), ॲडव्होकेट अरुण पाटील, प्रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ महाविद्यालय, धुळे, प्रा. डॉ. राहुल निकम, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. एस. एस. साळुंखे तसेच कनिष्ठ विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक एस. एस. पाटील उपस्थित होते.
उद्घाटक आबासाहेब डी. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात अनिल पाटील यांच्या विद्यार्थीभिमुख संकल्पनेचे कौतुक करत, अशा प्रकारचे कोपरा वाचनालय संस्थेच्या सर्व शाळांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थी ग्रंथालयाच्या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अनिल पाटील यांच्या कार्याचा गौरव करत, विद्यार्थीहिताच्या अशा उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला चतुर पाटील, कल्याण नेरकर, किरण पाटील, आर. आर. पाटील, नितीन पाटील, विजेंद्र गवळे, दीपक पाटील, समाधान पाटील, हर्षल बेहरे, रूपाली पाटील, नीलिमा पाटील व अविनाश बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी ग्रंथालयाच्या व्यवस्थापनात ग्रंथपाल जागृती पाटील, उपग्रंथपाल देवयानी पाटील, अर्चना पाटील, पुस्तक नोंदणी प्रमुख श्रेया पाटील, पुस्तक वितरण प्रमुख निकिता पाटील, सुवर्णा खैरनार, पुस्तक देखभाल प्रमुख प्रगती पाटील, गायत्री पाटील, पुस्तक सुरक्षा प्रमुख सौरभ पाटील, दिव्येश पारधी, ओम पाटील, यश पाटील, किशोर देवासी, तसेच वर्ग प्रतिनिधी राधिका कोळी, चेतन पाटील, उन्नती पाटील, समर्थ पाटील, रितिका पाटील, कार्तिकी पाटील, गुंजन पवार, प्रणव पाटील, नम्रता लांडगे, हर्षदा पाटील, हेमलता पवार आणि माधवी पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाल हाडपे यांनी केले.

Leave a Reply