
डीएल सोशल फाउंडेशनतर्फे महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली असून, महिला व विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळावे आणि त्यांच्यात डिजिटल कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने डीएल सोशल फाउंडेशन, अमळनेर यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
समुदाय विकास व सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा कालावधी एक महिना असून, सुरुवातीच्या पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना संगणकाच्या वापरासोबतच डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘डिजिटल ज्ञान — स्वावलंबी जीवनाची पहिली पायरी’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांनी प्रवेश मर्यादित असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी डीएल सोशल फाउंडेशन कार्यालय, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७७९६११२८९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply