अमळनेर शहरात जयनिल फाउंडेशन व अल-खिदमत ट्रस्टतर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

धार्मिक स्थळांपासून कब्रस्तानापर्यंत वृक्षारोपणाचा हरित संदेश

अमळनेर (प्रतिनिधी ): पर्यावरण संवर्धनासोबतच अमळनेर शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने जयनिल फाउंडेशन, अमळनेर आणि अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. धार्मिक स्थळ, शैक्षणिक संस्था आणि मुस्लिम कब्रस्तान अशा विविध ठिकाणी वृक्षलागवड करून सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या मोहिमेची सुरुवात हजरत बाले मियाँ दरगाह शरीफ येथे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर रॉयल उर्दू हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या सर्व स्टाफच्या वतीने जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांचा शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर अमळनेर मुस्लिम कब्रस्तान परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील विविध भागांत झाडे लावून त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या उपक्रमात जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, हाजी शब्बीर पहलवान, हाजी रफीक तेली साहेब, हाजी अखलाक सर, असलम पठाण, तसेच अल-खिदमत ट्रस्टचे अज़हर काज़ी, अयाज बागवान, समीर सय्यद, हुज़ैफा खान, सकलेन खान, तनवीर शाह, जैद शेख, दानिश खान यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

“आज लावलेले रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवी भेट”, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित देखभाल करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जयनिल फाउंडेशन आणि अल-खिदमत ट्रस्टच्या या संयुक्त सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे अमळनेर शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *