शासकीय भरड धान्य खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात; शेतकऱ्यांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शासकीय भरड धान्य खरेदी प्रक्रियेसाठी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला आहे. तालुका फ्रूट सेल सोसायटी येथे ज्वारी व मका खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवार, दि. ७ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

बाजारातील दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना अनेकदा योग्य मोबदला मिळत नाही. अशा परिस्थितीत शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांना स्थिर व योग्य दर मिळण्यास मदत होते. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.

नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आधारकार्ड, ७/१२ उतारा, पीक पेरणीची नोंद व बँक खात्याची माहिती ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *