
श्री गोविंद महाराज पुण्यतिथीसह महाशिवरात्रनिमित्त धार्मिक सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानचे द्वितीय सत्पुरुष श्री गोविंद महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तसेच महाशिवरात्र निमित्ताने दि. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र निमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुद्रयाग स्वाहाकार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वेदाचार्य अभयशास्त्री जोशी (वेद पाठशाळा) यांचे पौरोहित्य लाभणार आहे.
यात दैनंदिन कार्यक्रमांत पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते दुपारी १२ चरित्र पारायण, सायं. ५ ते ६ रामरक्षा व स्तोत्रपठण, सायं. ६ ते ७ हरिपाठ, तसेच रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन असा समावेश आहे. पारायण व्यासपीठाचे नेतृत्व ह.भ.प. शारंगधर गुरुजी व ह.भ.प. गोपाल गुरुजी (वारकरी पाठशाळा, अमळनेर) करणार आहेत. कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. चत्रभुज बुवा (धरणगाव), ह.भ.प. रमाकांत बुवा (सटाणा), ह.भ.प. सारंगधर बुवा (अमळनेर) व ह.भ.प. माधवदास बुवा राठी (नाशिक) यांची कीर्तने होणार आहेत. तसेच परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराजांच्या परंपरेतील काल्याचे भजन सादर होणार आहे.
पारायणास बसणाऱ्या भाविकांनी संस्थान कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पारायणकर्त्यांनी स्वतःचा ग्रंथ सोबत आणावा. ग्रंथ नसल्यास संस्थानतर्फे पारायण समाप्तीपर्यंत ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र पारायणानंतर तो संस्थानमध्ये जमा करणे आवश्यक राहील. या पुण्यतिथी व महाशिवरात्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply