पूज्य साने गुरुजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी फिरोज पठाण यांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य साने गुरुजी वरिष्ठ नोकरांच्या नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी फिरोज खा फय्याज खा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्यात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवड प्रक्रियेदरम्यान पतसंस्थेचे संचालक मनोज शर्मा, गणेश बोरोले, शेखर देशमुख, सोमचंद संदानशिव, प्रमोद लटपटे, पूजा उपासनी, सलीम पठाण, ईश्वर पाटील, राधा नेतले यांच्यासह सभासद इकबाल पठाण, सादिक सफदर, प्रविण शेलकर, विजय महाजन, विशाल भावसार आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली. यासाठी सहाय्यक निबंधक एस. पी. महाजन तसेच सचिन नंदू कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. नवीन चेअरमन फिरोज पठाण यांनी सर्व सभासदांचे आभार मानत पतसंस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *