
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत अमळनेर नगर परिषदेला अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन प्राप्त
अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरिक 2.0) अंतर्गत अमळनेर नगर परिषदेला अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन वाहन प्राप्त झाले आहे.
या वाहनामुळे शहरातील गटारी, नाले, सांडपाणी वाहिन्या व जलनिस्सारण यंत्रणेतील गाळ, कचरा आणि अडथळे दूर करणे शक्य होणार आहे. मान्सूनपूर्व नियोजन, सार्वजनिक आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी हे वाहन महत्त्वाची भूमिका बजावणार असून नागरिकांना चांगली स्वच्छता सुविधा उपलब्ध होणार आहेत. नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर आणि प्रशासनाच्या पाठपुराव्याने हे मशीन प्राप्त झाले.

Leave a Reply