
पूर्णवाद परिवारातर्फे ‘अमळनेर भूषण’ व ‘सेवाव्रती’ पुरस्कारांचे आज वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील जीवन कला संस्कार केंद्र व श्री पारनेरकर गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘अमळनेर भूषण’ पुरस्कार यंदा श्री ओमप्रकाशजी मुंदडा यांना, तर घ. भी. धांडे सेवाव्रती पुरस्कार डॉ. अविनाश जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणेश पारनेरकर (अध्यक्ष, गुरुसेवा मंडळ पारनेर) हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून भरत अमळकर (अध्यक्ष, केशव स्मृती समूह, जळगाव) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्व भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक रावेरकर यांनी केले आहे.

Leave a Reply