
अमळनेर बाजार समितीच्या कार्यपद्धतीचा शिरपूरच्या संचालकांकडून अभ्यास
अमळनेर (प्रतिनिधी) बाजार समितीची कार्यपद्धती, शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच विविध विकासकामांची माहिती जाणून घेण्यासाठी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व उपसभापती सुरेश पाटील यांचा शिरपूर बाजार समितीच्या संचालकांकडून सत्कार करण्यात आला.
अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाच्या शासकीय खरेदीसाठी करण्यात येणारी मोफत ऑनलाइन नोंदणी, लिलाव पद्धती, नव्याने राबविण्यात आलेल्या योजना, शेतकरी भवन, व्यापारी भवन, गुमास्ता कट्टा, शेतकरी पुरस्कार तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेती उपयोगी भेटवस्तूंच्या वाटपाचे नियोजन आदी विविध उपक्रम व व्यवस्थेची शिरपूरच्या संचालकांनी माहिती घेतली. तसेच बाजार समितीतील विकासकामांची पाहणी करून त्यामागील नियोजन व व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. शिरपूर बाजार समितीचे सभापती लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह आनंदसिंग राऊळ, शिवाजी पाटील, राजकपूर मराठे, शांतीलाल जमादार, मिलिंद पाटील, किरण पाटील आदी संचालकांनी अमळनेर बाजार समितीला भेट दिली. अमळनेर बाजार समितीच्या कार्यपद्धतीचे व शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे संचालकांनी कौतुक केले. यावेळी सभापती अशोक पाटील व उपसभापती सुरेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply