
रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ग्याच्या जवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील एक मागासवर्गीय २४ वर्षाची परित्यक्ता महिला रेल्वेत भीक मागते. तिची अमळनेर येथील आकिबखान गफ्फारखान याच्याशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटत होते. प्रत्येकवेळी आकीबखान तिला जेवण व पैसे देत होता. ६ रोजी ती महिला बऱ्हाणपूर हुन रेल्वेत आली असता आकीबने तिला उतरवून घेतले व तिच्यासोबत गप्पा झाल्यानंतर तिला मोटरसायकल (एमएच १९, डीजे २९५५)वर सोबत समीर नावाचा मित्र असे तीन सीट धार येथील पिर बाबांच्या दर्ग्याकडे घेऊन गेला. दर्ग्याच्या खालच्या बाजूला गाडरस्त्यावर एका पत्र्याच्या झोपडीत त्याने बियर पिऊन महिला सोबत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण करून बळजबरीने पत्र्याच्या शेड मध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यांनंतर महिलेने आता कोठे जाऊ असे सांगितल्यावर त्याने तिला परत स्टेशनवर आणून सोडले. महिलेने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनास्थळी नेले. घटनस्थळी मारवड पोस्टे अंतर्गत येत असल्याने महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला अत्याचार व अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply