
जळगाव येथे खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेचा सभासद पाल्यांचा केला गुणगौरव
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल प्रेरणा निर्माण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र निकम उपस्थित होते. तसेच महासचिव विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगरचे सचिव शेखर उंडे, सदस्य अमोल शिंदे, नाशिक टीडीएफ संघटक दिनेश देवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य हेमंत कुमार पाटील, देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन तसेच जिल्हा कार्याध्यक्ष राकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षण क्षेत्रात पुढेही अशीच यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अमित चौधरी, उपाध्यक्ष स्वप्निल पाटील तसेच संचालक प्रसन्ना बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संतोष मराठे, प्रशांत साखरे, रूपाली पाटील, स्वाती फिरके, प्रफुल्ल सरोदे, वना महाजन, धनंजय काकडे, अविनाश घुगे उपस्थित होते. तसेच तज्ञ संचालक महेंद्र रामोसे, मोहन पालवे आणि कर्मचारी सचिन पाटील, सागर जावळे, महेश पाटील यांचीही उपस्थिती होती.
गुणगौरव सोहळ्यास खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, संस्थेचे माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष, माजी संचालक, सर्व सभासद बंधू तसेच गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक सुनील पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक गणेश लोडते यांनी केले.

Leave a Reply