संत सखाराम महाराज संस्थानाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी एस पाटील यांनी दिली भेट

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेरचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानात लागलेल्या भीषण आगीत झालेल्या नुकसानीची पाहणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी केली. मंदिर परिसराची सविस्तर पाहणी करून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला तसेच संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराजांचे दर्शन घेतले. आगीत झालेल्या नुकसानीसंदर्भात संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुनर्बांधणीबाबत आवश्यक माहिती घेतली. तसेच संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यांची होती उपस्थिती

 

यावेळी संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त प.पू. प्रसाद महाराज (गुरु ज्ञानेश्वर महाराज), विश्वस्त रविकांत देशमुख, जयंत मोडक, एकनाथ सातपूरकर, प्रसाद नाईक, संस्थानचे सल्लागार राजेंद्र भामरे, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व त्यांची पत्नी सुनीता पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेवक पंकज चौधरी, पंकज भोई, अबू महाजन, पांडू भोई, गुलाब पाटील, श्रीराम चौधरी, नाना धनगर, सुरज परदेशी, भैय्या परदेशी, रवी पाटील उपस्थित होते.

 

अग्निशमन पथकाचा केला गौरव

 

आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून मोठी हानी टाळणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव केला. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *