
नितीन पाटील यांची भाजप जानवे मंडळ किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढेकू येथील युवा कार्यकर्ते नितीन आधार पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जानवे मंडळ किसान मोर्चा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे तसेच पक्षाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे प्रश्न मांडणे, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघटित करण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे व्हावे या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव आत्माराम पाटील यांनी नितीन पाटील यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जानवे मंडळात पक्षाचे कार्य अधिक जोमाने वाढेल तसेच संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून शेतकरी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल ढेकू परिसरासह जानवे मंडळातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply