
भाजप किसान मोर्चा आघाडीच्या जिल्हा चिटणीसपदी संजय पाटील यांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा किसान मोर्चा आघाडीच्या जिल्हा चिटणीसपदी संजय शामराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा जिल्हाध्यक्ष श्रीनिवास केशवराव मोरे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि विभागीय संघटनमंत्री रवि अनासपुरे यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल जावळे, प्रदेश सचिव मंगेश चव्हाण तसेच प्रदेश सचिव भैरवी वाघ-पलाडे आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.
नियुक्तीनंतर संजय पाटील यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल परिसरातून स्वागत होत आहे.

Leave a Reply