करणखेड्यात घरात घुसून तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडा येथे घरात एकटी असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी घरात एकटी असताना धीरज अनिल पाटील हा जबरदस्तीने घरात शिरला. त्याने तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ करत आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. यानंतर त्याने तरुणीच्या अंगावर हात ठेवत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेदरम्यान तरुणीने धैर्य दाखवत आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. नागरिकांनी घरात आरोपीला पकडून ठेवले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून धीरज अनिल पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *